शुक्रवार, 29 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : मंगळवार, 27 सप्टेंबर 2022 (20:02 IST)

पतंगांनी घेतला दोघांचा जीव

/kites took lives
मकर संक्रांतीमुळं सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे. जळगावकरांसाठी आजचा दिवस मात्र, दुःखदायक ठरलाय. पतंगाच्या नादात दोन मुलांना आपला जीव गमवावा लागलाय. जळगाव शहरापासून काही अंतरावर असलेल्या कुसुंबा गावात, पतंग उडवत असताना विजेचा शॉक लागून हितेश ओंकार पाटील नावाच्या मुलाचा मृत्यू झाला. प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार हितेशचं पतंग विजेच्या तारांवर अडकलं होतं. ते पतंग काढताना त्याला विजेचा शॉक लागला.
 
दुसरी घटना शहरातील कांचननगरात घडली. पतंग उडवण्यासाठी जाऊ दिले नाही म्हणून यश रमेश राजपूत यानं झोक्याच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या दोन्ही घटना घडल्यानंतर जिल्हा रुग्णालयात मृतांच्या नातेवाईकांची गर्दी झाली होती.