गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 9 जानेवारी 2022 (17:05 IST)

टेम्पोच्या खाली येऊन 5 वर्षाच्या चिमुरडीचा दुर्देवी अंत

कोल्हापूरच्या संभाजीनगर येथे रस्ताच्या कडेला थांबलेल्या टेम्पोच्या दार अचानकपणे उघडल्यामुळे त्याची धडक दुचाकीला लागली आणि त्यावर स्वार असलेले वडील आणि मुलगी अचानक खाली पडले आणि मागून येणाऱ्या टेम्पोचे चाक 5 वर्षाच्या चिमुकलीच्या डोक्यावरून गेल्याने तिचा जागीच दुर्देवी अंत झाला. अन्वी विकास कांबळे असे या मयत मुलीचे नाव आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार अन्वी कांबळे आणि तिचे वडील विकास कांबळे हे दोघे दुचाकी वरून वारे वसाहतीत रायगड कॉलोनीतील घराकडे जात असताना संभाजीनगर जवळ एका गॅस एजन्सीच्या दारात उभारलेल्या गॅस सिलेंडरचा टेम्पो चालकाने अचानक उघडल्यावर मागून येणाऱ्या कांबळे यांच्या दुचाकीच्या हॅण्डलला धडक बसली आणि विकास आणि अन्वी पाठीमागून येणाऱ्या टेम्पोच्या तावडीत सापडले आणि कोणाला काही समजेल त्यापूर्वीचीच त्या टेम्पोचे चाक चिमुरड्या अन्वीच्या डोक्यावरून गेले. या मुळे तिचा जागीच अंत झाला. तर विकास हे जखमी झाले आहे. हे बघता नागरिकांनी गर्दी जमा केली आणि संतप्त जमावाने टेम्पोवर दगडफेक केली. या मुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. नागरिकांनी टेम्पोखालून अन्वी आणि विकास यांना बाहेर काढले. आणि तातडीने रुग्णालयात दाखल केले. अपघाताची माहिती मिळतातच कांबळे यांचा कुटुंबीयांनी रुग्णालयात धाव घेतली आणि अन्वीला बघतातच त्याचा आक्रोश सुरु झाला.