1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 2 नोव्हेंबर 2022 (15:24 IST)

खासदार संजय राऊत कोठडीत राहावे लागणार

sanjay raut
खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. पण, त्यांना आणखी काही दिवस कोठडीत राहावे लागणार आहे. कारण, त्यांच्या जामीन अर्जावर 9 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे.
 
दरम्यान, संजय राऊत हे कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी न्यायलयीन कोठडीत आहेत. संजय राऊत यांनी जामीन मिळण्यासाठी कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. यावर निर्णय देताना कोर्टाने सुनावणी पुढे ढकलली. आता 9 नोव्हेंबरला त्यांच्या जामीन याचिकेवर सुनावणी होणार आहे.
 
संजय राऊतांच्या जामिनासंदर्भात ईडीने आज लेखी उत्तर सादर केले. जामिनावरील निकाल न्यायालयाने राखून ठेवला आहे. दरम्यान, संजय राऊतांना कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीनं अटक केली होती. विशेष म्हणजे प्रविण राऊत आणि संजय राऊत यांच्या जामीनावर एकाच दिवशी 9 नोव्हेंबरला कोर्ट निर्णय देणार आहे. आजच्या सुनावणीवेळी त्यांचे कुटूंबदेखील कोर्टात हजर होते.
Edited by : Ratnadeep Ranshoor