1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 29 डिसेंबर 2021 (16:03 IST)

खासदार सुप्रिया सुळे यांना कोरोनाची लागण !

MP Supriya Sule infected with corona!खासदार सुप्रिया सुळे यांना कोरोनाची लागण ! Marathi Regional News  In Webdunia Marathi
खासदार सुप्रिया सुळे यांना कोरोनाची लागण झाली आहे. सुप्रिया सुळे यांचे पती सदानंद सुळे हे ही कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.(Supriya Sule)
आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून सुळे यांनी याबद्दल माहिती दिली आहे सुप्रिया सुळे यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. संपर्कात आलेल्या लोकांनी चाचणी करुन घेण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.
मी आणि सदानंद, आम्हा दोघांचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.
काळजी करण्याचे कारण नाही पण आमच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करुन घ्यावी,ही नम्र विनंती. काळजी घ्या, असं ट्विट त्यांनी केलं आहे.
राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या मुलाच्या लग्नात त्याचबरोबर निहार ठाकरे आणि अंकिता पाटील यांच्या लग्नातही सुळे यांनी हजेरी लावली होती. त्यामुळे त्या अनेकांच्या संपर्कात आल्या असल्याची शक्यता आहे.