1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

मुंबई- अंधेरी रेल्वे पादचारी पुलाचा भाग कोसळला

andheri railway bridge
मुंबई येथे अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलावरील पादचारी पुलाचा भाग पडला आहे. या दुर्घटनेमध्ये पाच जण जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे.
 
पुलाचा ढिगारा कोसळ्यामुळे ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे अप आणि डाऊन दिशेची वाहतूक ठप्प झाली आहे. माहितीनुसार पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूक सुरळित होण्यासाठी समुारे 5 तास तरी लागतील. एकीकडे पाऊस आणि दुसर्‍या बाजूला लोकल सेवा बंद झाल्याने प्रवाशांना त्रासाला सामोरं जावं लागतयं. तसेच या दुर्घटनेमुळे वांद्रे, दादर आणि सेंट्रलहून सुटणाऱ्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांच्या वेळात बदल करण्यात येणार आहे.