शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2019 (10:13 IST)

मुंबई पुणे मुंबई रेल्वे प्रवास, अनके रेल्वे महिनाभर बंद

मुंबई-पुणे-मुंबई रेल्वे मार्गावर कर्जतदरम्यान तांत्रिक काम केले जाणार आहे. या कारणामुळे आता येत्या 30 नोव्हेंबर 2019 पर्यंत म्हणजेच पूर्ण महिनाभर काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहे. यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून एसटी महामंडळामार्फत 70 जादा बसेस सोडण्यात येत आहेत. या सर्व बसेस मुंबई-पुणे, ठाणे-पुणे मार्गावर चालवण्यात येतील. यात शिवनेरी बस वाहतुकीचे मुंबई-पुणे-मुंबई मार्गावर सरासरी 278 फेऱ्या प्रवाशांसाठी उपलब्ध करुन दिल्या असून, सोबतच 36 निमआराम वाहतुकीच्या फेऱ्याही मुंबई पुणे मार्गावर सुरु केल्या आहेत. यासोबतच मुंबई, परळ, कुर्ला येथून पुणे मार्गावर जाणाऱ्या 290 फेऱ्या उपलब्ध केल्या आहेत. त्यामुळे आता पुणे मार्गावर जाण्यासाठी दररोज 465 फेऱ्या उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
 
या व्यतिरिक्त प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून सध्या ठाणे विभागाने 20, मुंबई विभागाने 15, पुणे विभागाने 15 बसेस सोडल्या आहेत. याशिवाय शिवनेरी बससेवेच्या 20 बसही सोडण्यात आल्या असून, त्यामुळे दररोज 70 जादा बस फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त आवश्यकता भासल्यास प्रवाश्याच्या गर्दीनुसार जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.