नाशिक शहरात या तीन ठिकाणी महापालिका उभारणार अद्ययावत रुग्णालये
नाशिक शहराच्या विकासासाठी पंचवटी, सिडको, सातपूर आणि गंगापूर या ठिकाणी नवीन अद्ययावत रुग्णालये महापालिकेच्या वतीने सुरू करण्यात येणार असल्याची माहिती स्थायी समिती सभापती गणेश गिते यांनी स्थायी समितीच्या सभेत दिली आहे.
नाशिक महानगरपालिकेच्या स्थायी समितीची बैठक सभापती गणेश गिते यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन पद्धतीने पार पडली.पंचवटीतील भांडाराची असलेली जागा रिकामी झाली असून त्या जागेवर शंभर बेडचे अद्यावत असे रुग्णालय तयार केले जाणार आहे.तर शहरांमध्ये इतर भागांमध्ये अद्ययावत रुग्णालय नसल्याने सातपूरला एक आणि गंगापूररोडला एक असे शंभर बेडचे नवीन रुग्णालय उभारण्यात येणार असल्याचे गिते यांनी सांगितले.
त्याच बरोबर शहरातील गॅस पाईपलाईन व रिलायन्स जिओ यांच्या कामांना स्थगिती देण्यात येत असून जोपर्यंत ते नवीन दराने महापालिकेला पैसे अदा करत नाही तोपर्यंत हे काम स्थगित केले असल्याचे देखील गिते यांनी म्हंटलं आहे. तर या बैठकीत बोलताना सदस्य राहुल दिवे, मुकेश शहाणे, यांनी काही प्रश्न उपस्थित केले त्यावर प्रशासनाच्या वतीने खुलासा करण्यात आला.अंगणवाडी सेविकांचा राहिलेला पगार हा तातडीने अदा करण्यात येणार आहे. त्यांना 31 मार्चपर्यंत पूर्ण होतील त्यामुळे त्यांचे वेतन रखडल्याचे कबूल करत वैद्यकीय अधीक्षक नागरगोजे यांनी काही वैद्यकीय कामांमध्ये हलगर्जी झाल्याची कबुली दिली आहे.