1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 20 ऑक्टोबर 2021 (08:27 IST)

व्हाइटनर न दिल्याने नशेबाजाने केला खून; नाशिकची घटना

Murder committed by a drug addict without giving Whitner; The incident in Nashik Maharashtra News Regional  Marathi News Webdunia Marathi
व्हाइटनरची नशा करणाऱ्या दोघांमध्ये झालेल्या वादातून एकाने चाकू पोटात भोसकून त्याच्या मित्राचा खून केल्याचा प्रकार सोमवारी रात्री नाशिकच्या दूधबाजार, भद्रकाली येथे उघडकीस आला. नितीन गायकवाड (२५) असे या खून झालेल्या युवकाचे नाव आहे. हल्ला करणाऱ्या संशयिताला नागरिकांनी पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र तो जमावाच्या तावडीतून सुटून पसार झाला. भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आला .
 
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दूधबाजारात रात्री व्हाइटनरची नशा करणाऱ्या दोघा मित्रांमध्ये वाद झाला. दोघे व्हाइटनर ओढत असताना संशयिताने व्हाइटनर ओढण्यास मागितले. मयत नितीन याने देण्यास नकार दिला. या रागातून संशयिताने खिशातून चाकू काढत नितीन गायकवाडच्या पोटात खुपसला. कोथळा बाहेर पडल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. परिसरातील नागरिकांनी तत्काळ रिक्षातून जिल्हा रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. संशयित हल्लेखोरास नागरिकांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, संशयित जमावाच्या तावडीतून सुटून गर्दीतून फरार झाला. घटनेची माहिती मिळताच उपआयुक्त अमोल तांबे, यांच्यासह गुन्हे शाखा युनिट १ चे विजय ढमाळ, मध्यवर्ती गुन्हे शाखेचे आंचल मुदगल यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. वरिष्ठ निरीक्षक संभाजी निंबाळकर, दत्ता पवार यांनी तपासाची सूत्रे वेगाने फिरवत मयताच्या घरचा पत्ता शोधला. तो भारतनगर येथील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले.