रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शिर्डी , शनिवार, 13 जुलै 2019 (14:18 IST)

शुल्लक कारणावरून शिर्डीत तिघांची गळे चिरुन हत्या

एकाच कुटुंबातील तिघांची कोयत्याने गळे चिरून हत्या केल्याची खळबळजनक घटना आज उघडकीस आली आहे. सकाळी साडेसहा वाजता ही घटना घडली आहे. या घटनेने शिर्डी परिसरामध्ये खळबळ उडाली आहे
 
शेजार्‍यानेच हे हत्याकांड केले असून त्याच्या हल्ल्यात दोघे जण बचावले आहेत. त्यांच्यावर साईबाबा सुपर हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहे.
 
याबाबत पोलिसांनी सांगितले की, शिर्डी जवळील निमगाव शिवारात मंगेश कातोरे यांच्या वस्तीवर राहणार्‍या ठाकुर कुटुंबियांची हत्या करण्यात आली आहे.हा प्रकार शेजारीच राहणार्‍या अर्जुन पन्हाळे याने केला आहे. नामदेव ठाकूर, दगाबाई नामदेव ठाकूर व खुशी ठाकूर यांचा मृतांमध्ये समावेश आहे. तर राजेंद्र ठाकूर व एक सहा वर्षाची मुलगी जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
 
दरम्यान, दारात लघुशंका केल्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून हे हत्याकांड झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.