गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 16 ऑक्टोबर 2020 (17:10 IST)

बाप्परे, चार अल्पवयीन भावंडांची हत्या, हत्येचे कारण अजून समजले नाही

जळगाव जिल्ह्यातील रावेर येथे बोरखेडा रस्त्यानजीकच्या शेतामधील एका घरात चार अल्पवयीन भावंडांची हत्या करण्यात  आली आहे. ही हत्या कोणी आणि कशासाठी केली, याची माहिती मिळू शकलेली नाही. अज्ञाताकडून ही हत्या झाल्याचे सांगण्यात येत आहे. 
 
रावेर शहरापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर असलेल्या  एका शेतात सालदार म्हणून राहणाऱ्या महताब आणि रुमली बाई भिलाला हे दाम्पत्य आपल्या मध्यप्रदेशातील मूळ गावी गेले आहे. मात्र, शेतातील घरात ही चार भावंडे एकटीच राहत होती. रात्रीच्या सुमारास या चारही भावंडांची कुर्‍हाडीने हत्या केल्याचे पुढे आले आहे. सकाळी शेतमालक शेतात आल्याने हा सगळा प्रकार उघड झाला.
 
मृतांमध्ये १२, ११, ८ आणि ३ या वर्षांच्या मुलांचा समावेश आहे. यात १२ वर्षांची मोठी बहीण आणि तीन वर्षांची चिमुकलीचा समावेश आहे. तर एका भावाचे वय ११ आणि दुसऱ्या भावाचे वय अवघे ८ वर्ष आहे.