संबंधित माहिती
- बाप्परे, चार अल्पवयीन भावंडांची हत्या, हत्येचे कारण अजून समजले नाही
- नात्याला काळीमा, रागात नातवाने आजोबांचीच केली हत्या
- सोशल मीडियावर केलेल्या पोस्टचा वाद शिगेला, एकाची निर्घृणपणे हत्या
- पुणे हादरले, शिवसेना दिवंगत माजी नगरसेवक विजय मारटकर यांच्या मुलाचा खून
- बाप्परे, 10 महिन्यांच्या चिमुकल्याचं अपहरण करून निर्घृण हत्या
रावेर येथील चार भावंडांची हत्या, एका आरोपीला अटक
ळगाव जिल्ह्यातील रावेर येथील चार भावंडांच्या हत्याकांड प्रकरणी जळगाव जिल्हा पोलिसांनी अखेर एका आरोपीला अटक केली आहे. महेंद्र सीताराम बारेला या १९ वर्षीय तरुणाला अटक आहे. वैद्यकीय पुराव्यांच्या आधारावर ही अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे यांनी दिली आहे.
या प्रकरणात मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे उघड झाले असुन सामूहिक अत्याचार झाला आहे का, याबबत तपास सुरू आहे. ८० पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तपास करत आहे. रावेर येथील शेतात चार भावंडाची रात्री हत्या करण्यात आली होती. कुऱ्हाडीने ही हत्या केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. दरम्यान, मुलीवर अत्याचार झाल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे.
पोलीस अधिक्षक प्रविण मुंडे यानी रावेर येथे पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली. एकुण ७० लोकांची रावेर हत्याकांडात चौकशी केली आहे. ६० दिवसात चार्जशिट दाखल करणार असून, आरोपीनां शिक्षा होईल, असा विश्वास प्रविण मुंडे यांनी व्यक्त केला आहे.
