शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 18 एप्रिल 2023 (08:10 IST)

पत्नीशी असलेल्या प्रेमसंबंधातून एकाचा खून; नाशिक जिल्ह्यातील घटना

murder
नाशिक :– विटभट्टीवर कामास असलेल्या एका कामगाराच्या पत्नीशी तेथीलच एका कामगारांचे प्रेम संबंध असल्याचे समजल्याने पतीने त्याचा खून केल्याची घटना इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव अस्वली रोडलगत असलेल्या गरुडेश्वर शिवारात घडली.
 
फिर्यादी शांताबाई मधू मुकणे या मूळच्या पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील जोगलवाडी येथील रहिवासी आहेत. हल्ली त्या कामानिमित्त घोटीजवळील वांगेवाडी जवळील वीटभट्टीवर काम करतात. त्यांच्यासोबत मुलगा संपत मुकणे हे देखील वीटभट्टीवर रोजंदारीवर काम करत होते. दरम्यान, संपतच्या पत्नीचे घोटी येथील शंकर वळवी यांच्यासोबत प्रेमसंबंध निर्माण झाले. म्हणून ते दोघे 9 एप्रिल 2023 रोजी पळून गेले होते. याचा राग मनात धरून अनेकदा संपत मुकणे याने शंकर यास विचारणा केली होती.
 
शंकर दळवी हा संपतला वारंवार उडवाउडवीची उत्तरे देत होता. दरम्यान शनिवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास हे दोघेही वीटभट्टीवर असताना बुधा रतन वळवी आणि शंकर रतन वळवी यांनी संपत मुकणे यास लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत संपतचा मृत्यू झाला. पुरावा नष्ट करण्यासाठी त्यानंतर त्याचे प्रेत गरुडेश्वर शिवारात मरिमाता मंदिरालगत फेकून दिले.
 
सकाळी उशिरा येथून जाणाऱ्या गावकऱ्यांना मुकणे हे मृत अवस्थेत दिसले. त्यांनी तत्काळ वाडीवऱ्हे पोलिसांना घटनेची माहिती दिली. वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल पवार, पोलीस उपनिरीक्षक सुनील बिऱ्हाडे यांनी तत्काळ घटनास्थळ धाव घेतली. पोलिसांनी दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल केला असून बुधा वळवीला अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
 
Edited By - Ratnadeep ranshoor