गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 17 एप्रिल 2023 (21:39 IST)

राष्ट्रवादी कधीही भाजपबरोबर जाणार नसल्याची खात्री शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना दिली : संजय राऊत

sanjay raut
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष भाजपशी कधीही हातमिळवणी करणार नसल्याचे सांगून जरी कोणत्याही आमदाराने वैयक्तिकरित्या असा निर्णय घेतला तरी राष्ट्रवादी कॉंग्रेस कधीही भाजपबरोबर जाणार नसल्याची खात्री शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना दिल्याची माहीती खासदार संजय राऊत यांनी माध्यमांना दिली.
 
राज्यामध्ये राष्ट्रवादीचे प्रभावी नेते अजित पवार सत्ताधारी भाजपशी हातमिळवणी करण्यासाठी पक्षाशी बंडखोरी करण्याच्या तयारीत आहेत अशा बातम्या येत असताना खासदार राऊत यांनी शिवसेना पक्षाचे मुखपत्र सामनामधील ‘रोखठोक’ या साप्ताहिक स्तंभात आपले मत व्यक्त केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील 16 आमदारांना अपात्र ठरवण्याच्या याचिकेवरिल शिवसेनेचा वाद अजूनही सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. तरीही विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अशा प्रकारच्या शक्यतांना निराधार सांगून रात्री केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांची मुंबईत भेट झाल्याचा वृत्ताचा इन्कार केला.
Edited by : Ratnadeep Ranshoor