गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 8 नोव्हेंबर 2023 (21:59 IST)

Nagpur : डिप्रेशनमुळे तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

suicide
नागपुरात नैराश्याच्या आजाराचा  उपचार घेण्यासाठी आलेल्या तरुणीने डिप्रेशनमुळे नातेवाईकांच्या घरात  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना लक्ष्मीनगर येथे घडली आहे. रिद्धी ओमप्रकाश पालीवाल असे या तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी बजाजनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. 

रिद्धी ओमप्रकाश पालीवाल वय वर्ष 20 पारशिवनी येथे राहणारी असून नागपुरात  डिप्रेशनचा उपचार घेण्यासाठी आपल्या एका नातेवाईकांकडे आली होती. मंगळवारी दुपारी तिने नैराश्यातून घरामागील पाण्याच्या टाकीच्या लोखंडी स्टँडला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतला. बऱ्याच वेळा दिसली नाही शोध घेतल्यावर ती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. तिला तातडीनं रुग्णालयात  नेले असता तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले.पोलिसांना या घटनेची माहिती दिली असता पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली असून आत्महत्येचे कारणांचा तपास करत आहे. 
 


Edited by - Priya Dixit