सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 15 मे 2019 (10:58 IST)

बाप्परे, सांबारमध्ये चक्क पालीचं मेलेलं पिल्लू

नागपूरच्या अजनी परिसरातील प्रसिद्ध असलेल्या 'हल्दीराम' हॉटेलमधील सांबारमध्ये चक्क पालीचं मेलेलं पिल्लू आढळलं. नागपूरच्या अग्निहोत्री नावाच्या ग्राहकानं सांबार ऑर्डर केलं होतं. त्यावेळी समोर आलेल्या ताटात चक्क छोटी पालच त्यांना आढळली. हे पाहून ग्राहकाला पहिल्यांदा धक्काच बसला. या प्रकरणाची अन्न व औषध प्रशासनाकडे याची तक्रार करण्यात आली. त्यानंतर अन्न आणि औषध प्रशासनाने तत्काळ कारवाई करत सध्या हे रेस्टॉरंट बंद करण्याचे आदेश दिले आहेत.   
 
दरम्यान, अग्निहोत्री कुटुंबातील दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं समजतंय.