शुक्रवार, 12 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 15 मे 2019 (09:16 IST)

टिकटॉक व्हिडीओचा नाद खुळा, एकाला अटक

पिंपरीमध्ये हातात धारदार हत्यार घेवून टिकटॉक व्हिडीओ तयार करणे एकाला महागात पडले आहे. याप्रकरणी वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून दीपक आबा दाखले (वय २३) याला अटक केली आहे. 
 
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आरोपी दीपक याने परिसरात दहशत पसरविण्यासाठी टिकटॉकचा वापर करुन एक व्हिडीओ तयार केला. या व्हिडीओमध्ये वाढीव दिसताय राव या गाण्यावर हातामध्ये धारदार हत्यार घेवून तो एका घरातून बाहेर येताना चित्रिकरण करण्यात आले.  हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. दरम्यान, वाकड पोलिसांच्या हाती हा व्हिडीओ लागलाच त्यांनी दाखले याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून व्हिडीओमध्ये वापरण्यात आलेले हत्यार जप्त केले आहे.