1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 29 एप्रिल 2019 (09:29 IST)

ईपीएफवर ८.६५ टक्के व्याज मिळणार

EPF earns 8.65% interest
कर्मचारी भविष्य निधीवर (ईपीएफ) २०१८- २०१९ या आर्थिक वर्षासाठी ८.६५ टक्के इतके व्याज मिळणार आहे. कारण 'ईपीएफओ'ने घेतलेल्या निर्णयाला केंद्रीय अर्थ मंत्रालयाने तात्काळ मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता तुमच्या पीएफवर ८.६५ टक्के व्याज मिळणार आहे. या निर्णयाचा फायदा सुमारे ६ कोटी कर्मचाऱ्यांना होणार आहे. केंद्रीय कामगार राज्यमंत्री संतोषकुमार गंगवार यांच्या अध्यक्षतेखालील 'ईपीएफओ'च्या केंद्रीय विश्वस्त मंडळाने चालू आर्थिक वर्षासाठी ईपीएफ व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या तीन वर्षांतील ही पहिली व्याजदरवाढ ठरली आहे.