शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 27 एप्रिल 2019 (11:38 IST)

मुंबईत बघा आज पेट्रोलचे भाव

मुंबईत आज पेट्रोलचे भाव 78.65 रुपये प्रति लीटर आहे. डिझेल 69.72 रुपयांमध्ये विकत आहे. सर्व तेल कंपन्यांचे पेट्रोल पंपांवर सारख्या किंमती आहेत.
 
सलग तीन दिवस स्थिर राहिल्यानंतर देशातील पेट्रोल आणि डिझेलचे दर पुन्हा वाढल्याचे दिसून आले. सार्वजनिक क्षेत्रातील इंधनविक्री करणाऱ्या कंपन्यांनी दिल्ली, कोलकाता आणि मुंबईत प्रति लिटर पेट्रोलच्या दरात सात पैशांची तर, चेन्नईत आठ पैशांची वाढ केली आहे. त्याचवेळी डिझेलच्या दरात दिल्ली आणि कोलकातामध्ये आठ पैशांची तर, मुंबई आणि चेन्नईमध्ये नऊ पैशांची वाढ करण्यात आली आहे. 
 
जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढूनही इंधनदर स्थिर असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. निवडणूक आचारसंहिता लागल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींत केवळ 30 ते 50 पैशांची वाढ झाली आहे. ऐन निवडणुकीत दरवाढ झाल्यास त्याचा मतदानावर परिणाम होऊ शकतो, यामुळे ही दरवाढ रोखून धरण्यास तेल वितरक कंपन्यांवर सरकारने अप्रत्यक्षपणे दबाव टाकल्याचे समजले जाते.