मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 23 एप्रिल 2019 (09:47 IST)

उर्मिला मातोंडकर केवळ ग्लॅमर डॉल

उर्मिला मातोंडकर केवळ ग्लॅमर डॉल असून त्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव नाही, अशी टीका भाजप नेत्या शायना एनसी यांनी केली. शायना एनसी सोमवारी भाजपचे उत्तर मुंबई मतदारसंघातील उमेदवार गोपाळ शेट्टी यांच्या प्रचारासाठी काढण्यात आलेल्या प्रचारयात्रेत सहभागी झाल्या होत्या. काही दिवसांपूर्वी उत्तर मुंबईत गोपाळ शेट्टी यांचा विजय निश्चित मानला जात होता. मात्र, काँग्रेसने उर्मिला मातोंडकर यांना उमेदवारी दिल्यामुळे याठिकाणी चुरस निर्माण झाली आहे. उर्मिला यांना राजकारणाची चांगलीच जाण असल्याचे लक्षात आल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. त्यामुळे भाजप या मतदारसंघात कोणताही धोका पत्कारायला तयार नाही. त्यासाठी पक्षाचे अनेक नेते याठिकाणी प्रचाराला येत आहेत.