मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Modified: विजयपूर , सोमवार, 22 एप्रिल 2019 (15:50 IST)

लोकसभा निवडणूक : यंदा मतदानाचा टक्का वाढेल का?

ग्रामीण भागातील दुष्काळ, शहरी उदासीनता आणि स्थलांतर या कारणामुंळे आजवर मतदानाची टक्केवारी फारशी वाढलेली नाही. परंतु यंदा मतदानाचा टक्का वाढावा याकरिता प्रशासनाकडून विविध स्वरुपाचे प्रयत्न केले गेले. तेव्हा यंदातरी मतदानाचा टक्का वाढेल का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
 
मतदानाची टक्केवारी वाढविण्याकरिता जिल्ह्यामध्ये 2009 मध्ये स्वीप समिती स्थापन करण्यात आली. परंतु त्याचवर्षी सर्वात कमी मतदान झाल्याची नोंद आहे. तरीही निवडणूक आयोगमार्फत यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतदान वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. यामध्ये पथनाट्ये, मानवी साखळी, प्यारा शूटिंग, सायकल फेरी, प्रभात फेरी, पत्रकांचे वाटप, रांगोळी स्पर्धा असे अनेक प्रयत्न करून मतदारांना मतदान करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
 
विजयपूर जिल्ह्यातील 213 ग्रापंचातींच्या कार्यक्षेत्रात येणार्‍या 649 खेड्यातील मतदारांना यंदा स्वीप समितीच्या सदस्यांनी भेटी दिल्या. रोजगारासाठी स्थलांतर केलेल मतदारांना मतदानाला गावाकडे येण्यासाठी विनंतीपत्रेही पाठविण्यात आली. तेव्हा यंदा तरी मतदान वाढेल का हे 23 एप्रिल रोजी मतदान झाल्यानंतरच कळू शकेल. जिल्ह्यातील प्रचार आता संपला आहे. मतदारांमध्ये सध्या मोठा उत्साह दिसून येत आहे. यंदा किती टक्के मतदान होते याची उत्सुकता लागून राहिली आहे.
 
लोकसभा निवडणुकीत 1952 पासून 2014 पर्यंत मतदानाची टक्केवारी पुढीलप्राणे : 
 
1952- 48.41, 1957- 50.36, 1962- 50.96, 1967- 59.30, 1971- 49.54, 1977- 58.49, 1980- 55.59, 1984- 61.76, 1989- 63.11, 1996- 47.39, 1998- 57.82, 1999- 63.9 (सर्वाधिक मतदान), 2004- 59.54, 2009- 47.29, (सर्वात कमी), 2014- 59.71.