बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 24 एप्रिल 2019 (15:59 IST)

46 लाख 21 हजारांची रोकड रक्कम हस्तगत

मुंबईतल्या भायखळा भागात निवडणूक आयोगाच्या स्थिर तपासणी पथकाव्दारे 46 लाख 21 हजार रुपये रोकड रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. सायंकाळी 6.00 वाजताच्या सुमारास भगवा महल, बी.जे.मार्ग, सात रस्ता परिसरात भायखळा विधानसभा मतदारसंघातील युवराज पाटील यांच्या स्थिर तपासणी पथकाव्दारे ईको या (एम.एच.03 बी. सी. 312) वाहनाची तपासणी केली. या वाहनात ईश्वर प्रसाद सोलंकी यांच्याकडे 46 लाख 21 हजार रुपये रक्कम आढळून आली. याबाबत आयकर विभाग अधिक चौकशी करीत आहे. अशी माहिती 31-मुंबई दक्षिण लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी बन्सी गवळी यांनी दिली.