शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

मारुती सुझुकी डिझेल कार होणार गायब, 2020 पासून विक्री होणार बंद

देशातील सर्वात मोठी ऑटोमोबाइल क्षेत्रातील मारुती सुझुकी इंडियाने 1 एप्रिल 2020 पासून भारतात डिझेल कार न विकण्याचा निर्णय घेतला आहे. 
 
MSI चे चेअरमन आर.सी.भार्गव यांनी सांगितले की पुढील वर्षी म्हणजे 1 एप्रिल 2020 पासून देशात मारुती सुझुकी कंपनीच्या डिझेल कार विकल्या जाणार नाहीत. कंपनीद्वारे देशात विकल्या जाणार्‍या डिझेल वाहनांची भागीदारी सुमारे 23 टक्के आहे. 
 
आर्थिक फटका
देशात डिझेलच्या वाढत्या दरांचा आणि भारत स्टेज 6 या अंतर्गत प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्याच्या हेतूने ऑटोमोबाइल क्षेत्रावर लावलेल्या आर्थिक भाराचा फटका कंपनीला लागल्याचं समोर येत आहे. 23टक्के मिळकत ही परेशी नाही आणि प्रमुख बाजारातून कमी मागणी येत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
 
या गाड्यांची वाढली किंमत
Maruti Suzuki ने शेअर बाजाराला सांगितले की किंमत वृद्धीनंतर बलेनो आरएस ची किंमत 8.88 लाख रुपये असेल. आधी याची किंमत 8.76 लाख रुपये होती. या प्रकारे डिझेल श्रेणीतील कारची शोरूम किंमत आता 6.73 लाख रुपये ते 8.73 लाख रुपये यात असेल. आधी याची किंमत 6.61 लाख - 8.60 लाख रुपये होती.