रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 23 एप्रिल 2019 (14:20 IST)

जर तुमच्याकडे मारुती कार असेल तर त्वरित उचला मोफत सेवेचा फायदा

जर आपल्याकडे मारुती सुझुकी (Maruti Suzuki) ची कार आहे तर ही बातमी आपल्यासाठी मोठ्या कामाची
सिद्ध होऊ शकते. आपल्या ग्राहकांसाठी मारुतीने विशेष सेवा सुरू केली आहे. कंपनीतर्फे स्पेशल कॅम्पेन
‘Summer Ready Vehicle Health Check’ सुरू केलं आहे. या कॅम्पेनचा फायदा उचलून आपण आपल्या गाडीची फ्री सर्व्हिस करवू शकता.
 
या कॅम्पेनची सुरुवात 15 एप्रिल पासून झाली आहे. हे फ्री सर्व्हिस कॅम्पेन 30 एप्रिल पर्यंत चालेल. मारुती ग्राहक कोणत्याही सेवा केंद्रात जाऊन मोफत सेवेचा फायदा घेऊ शकतात. मारुतीचे देशभरात 2,200 पेक्षा अधिक डीलर वर्कशॉप आहेत. या कॅम्पेनअंतर्गत आपल्या वाहनाचे एसी, ऑयल ऍड कूलेंट चेक, बॅटरी, इलेक्ट्रिकल सिस्टम आणि टायर्स मोफत तपासले जातील.