बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 17 एप्रिल 2019 (14:58 IST)

नवीन मारुती आर्टिगा क्रॉसमध्ये मिळू शकतात हे शानार 10 फिचर्स, लवकरच होईल लॉन्च

मारुतीची नवीन एमपीव्ही आर्टिगा आपल्या नवीन स्वरूपात लॉन्च होणार आहे. हे आर्टिगाचे क्रॉस व्हर्जन आहे असे सांगण्यात येत आहे. याला आर्टिगाचा नेक्सा व्हर्जन म्हटले जात आहे आणि या गाडीला नेक्सा डीलरशिपद्वारेच विक्री करण्यात येईल. ही नवीनतम पाचव्या पिढीतील Heartect प्लॅटफॉर्मवर तयार केली जाईल. हे व्हर्जन विदेशात आधीच लॉन्च करण्यात आले आहे, दुसरीकडे ही गाडी यावर्षाच्या जुलै-ऑगस्टमध्ये भारतात देखील लॉन्च होऊ
शकते.
 
* चला जाणून घ्या, मारुती आर्टिगा क्रॉसमधील नवीनतम फीचर्स
 
1. ZXI+ AT (पेट्रोल) - सेकंड जनरेशन आर्टिगाच्या क्रॉस व्हर्जनमध्ये अनेक प्रिमियम फीचर्स सामील आहे. 1.5 लीटर SHVS पेट्रोल इंजिनासह लॉन्च करू शकतात.
 
2. एलईडी डीआरएल - स्टायलिश एलईडी डीआरएल आणि शार्प डिझाइन बंपरसह शानदार एक्सटेरियर देखील दिलं जाऊ शकतो.
 
3. कॅप्टन सीट्ससह 6 सीटर - मधल्या सीट्समध्ये शानदार आणि स्टायलिश कॅप्टन सीट्स मिळू शकतात. यासह ही 6 सीटर असेल.
 
4. क्रूझ कंट्रोल - या फीचरमध्ये सर्वो मेकेनिज्म कारच्या थ्रोटलवर नियंत्रण ठेवतो आणि स्पीड ऑटोमॅटिकली कंट्रोल होते. हाईवेवर हा फीचर अतिशय उपयोगी आहे.
 
5. 1.5 लीटर डिझेल आणि 1.5 लीटर पेट्रोल - K15B SHVS पेट्रोल इंजिन आणि नवीन 1.5 लीटर डिझेल इंजिन मिळेल. K15B SHVS पेट्रोल इंजिन हायब्रीड सिस्टमसह येईल.
 
6. लेदर सीट्स - छान इंटीरियर दिसणारे, लेदर सीट अपहोलस्ट्रीसह मेटॅलीक लुक देखील देतील.
 
7. ऑल ब्लॅक इंटरीयर - मारुति आपल्या अर्टिगाच्या क्रास वर्जनमध्ये ब्लॅक इंटीरियर देईल. याव्यतिरिक्त यात सनग्लासेस होल्डर आणि कूल्ड ग्लोव्ह बॉक्स फीचर देखील मिळेल.
 
8. प्रिसीजन कट अलॉय - प्रिसीजन कट अलॉय व्हील्स मिळू शकतात. एक्टीरियर लुक देखील चांगले होईल.
 
9. एलईडी प्रोजेक्टर - एलईडी डीआरएल सह एलईडी प्रोजेक्टरसह हेडलॅम्प्स देखील मिळतील. तथापि हे फीचर फक्त टॉप व्हेरिएंटमध्ये मिळू शकेल.
 
10. स्पोर्टी बंपर - स्टॅंडर्डच्या तुलनेत एक्सटीरियरमध्ये बदल होईल. तसेच नवीन कॉस्मेटिक अपडेट देखील सामील होतील. याशिवाय, पुढे आणि मागे स्पोर्टी बंपर देखील उपलब्ध होईल.