मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

वॅगन आर गाडी नव्या रुपात येणार

मारुती सुझुकीच्या सर्वाधिक विक्री झालेल्या वॅगन आर गाडीचे येत्या 23 जानेवारीला नव्या रुपात अनावरण होणार आहे. ही नवी गाडी अत्याधुनिक आहे. सोबतच या गाडीत नव्या सुविधा आहेत. या गाडीचे नवे रुप अगदी वेगळे आहे. आधीच्या वॅगन आरच्या तुलनेत नव्या गाडीत अनेक बदल केले आहेत. नवी गाडी जुन्या गाडीच्या तुलनेत आकाराने मोठी आहे.  २०२० सालापासून भारतात BS6चे नियम लागू होत आहेत. कमीत कमी प्रदूषणासाठी हे निकष लागू होतात. नव्या स्वरुपातील वॅगन आरमध्ये या इंजिन प्रणालीचा वापर केलेला आहे. यामुळे वायू प्रदूषणाला आळा बसण्यास मदत होणार आहे. 
 
वॅगनआरची ही नवी गाडी 5 आसनी आहे. या गाडीचे इंजिन उच्च श्रेणीतील असून त्याची क्षमता १.२ लीटरची आहे. या इंजिनाचा वापर याआधी स्विफ्ट, डिझायर आणि बलेनो या गाड्यांमध्ये केला आहे. हे इंजिन ८२  ब्रेक हॉर्स पावर (बीएचपी) इतकी उर्जा निर्माण करते. तसेच ११३ न्यूटन मीटर इतके टॉर्क निर्माण केले जाते. यामुळे 'वॅगन आर' या श्रेणीतील सर्वात ताकदवान गाडी होईल. कंपनीकडून या गाडीत सीएनजी आणि एलपीजी अशा दोन इंधनांचा पर्याय देण्यात येऊ शकतो.  गाडीची अंदाजित किंमत साडेचार ते साडेपाच लाखांच्या दरम्यान असेल.