शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 27 एप्रिल 2019 (10:11 IST)

......तर बायको सोडून जाईल : रघुराम राजन

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचा राजकारणात येण्याचा किंवा कोणताही राजकीय पक्ष सुरु करण्याचा कोणतीही इच्छा नाही. आपण जर राजकारणात प्रवेश करायचं ठरवलं तर बायको सोडून जाईल असं त्यांचं म्हणणं आहे. गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु होती की, लोकसभा निवडणुकीत जर विरोधी पक्षांचं सरकार आलं तर रघुराम राजन यांना अर्थमंत्री केलं जाण्याची शक्यता आहे. मात्र रघुराम राजन यांनी आपल्यासंबंधीच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. आपण जिथे आहोत तिथे प्रचंड आनंदी असून राजकारणात येण्याची कोणतीही इच्छा नाही असं त्यांनी म्हटलं आहे.