मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 8 मे 2019 (09:57 IST)

टाटा मोटर्स डिझेल कारचे उत्पादन बंद करणार

टाटा मोटर्सनेदेखील आपल्या लहान डिझेल कारचे उत्पादन बंद करण्याची घोषणा केली आहे. बीएस-६ मानक लागू झाल्यानंतर डिझेलच्या छोट्या तसेच मध्यम कार महाग होतील. या कारच्या मागणीचा विचार करता या प्रकारच्या पेट्रोल कारनाच अधिक मागणी आहे. भारतात १ एप्रिल २०२० पासून बीएस-६ प्रदूषण मानक लागू होत असून यामुळे अनेक कंपन्यांच्या डिझेल वाहनांमध्ये काही बदल करावे लागणार आहेत. त्यामुळे या कार महाग होऊ शकतात. या पार्श्वभूमीवर अशा कारची मागणीही कमी होऊ शकते. परिणामी पुढील वर्षापासून टाटा मोटर्स छोट्या डिझेल कारचे उत्पादन बंद करणार आहे, अशी माहिती कंपनीच्या प्रवासी वाहन विभागाचे अध्यक्ष मयंक पारिख यांनी दिली.