1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. Nagpur Police sub-inspector commits suicide by hanging himself

Nagpur: पोलीस उपनिरीक्षकाची गळफास लावून आत्महत्या

नागपुरातून पोलीस उपनिरीक्षकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गोपाळ गोळे (34)असे या मयत पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. मानसिक तणावातून त्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.  सदर घटना गिट्टीखदान पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलीस वसाहतीत घडली आहे. गोपाळ गोळे  यशोधरानगरच्या पोलीस ठाण्यात कार्यरत होते.हे गेल्या तीन दिवसांपासून पोलीस ठाण्यात गेले नव्हते. 

गोपाळ यांच्या पत्नी काही दिवसांपासून घरी नव्हत्या. त्यांनी गोपाळ यांना फोन केल्यावर त्यांचा फोन बंद असल्यामुळे त्यांना संशय आला त्यांनी पोलीस ठाण्यात आपल्या नवऱ्याची चौक्शी केल्यावर गेल्या तीन दिवसांपासून ते पोलीस ठाण्यात आलेले नाही असे समजल्यावर पोलीस ठाण्यातील दोन कर्मचारी त्यांच्या घरी पोहोचल्यावर गोळे घरात पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळले. त्यांच्याकडे कोणतीही सुसाईड नोट आढळली नाही. त्यामुळे पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहे. 
 
 Edited by - Priya Dixit 
पुढील लेख
आंबेडकरी चळवळीचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायिका किरण पाटणकर यांचे निधन