शनिवार, 9 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

नागपुरमध्ये राममंदिर प्राण प्रतिष्ठा निमित्त विविध कार्यक्रम

लकडगंज रामजन्मोत्सव समितीद्वारे नागपूरला राममय करण्याचा प्रयत्न केला जाता आहे. या निमित्ताने सकल सनातम समाज श्री रामधुन राम रैली २१ जानेवारी रविवार या दिवशी सकाळी नऊ वाजता निघणार आहे. श्री कालीमाता मंदिर, लकडगंज बागेजवळून येथून ही रैली निघणार आहे. 
 
तसेच २१ जानेवारी रविवारी लहान मुलांसाठी रामायणवर आधारित चित्रकला स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा दुपारी चार वाजता आयोजित केली आहे. महिलांसाठी रांगोळी स्पर्धा संध्याकाळी पाच आयोजित केली आहे. ही स्पर्धा श्री कालीमाता प्रांगणमध्ये होणार आहे. जर आपणास सहभागी व्हायचे असेल तर नाव नोंदणीसाठी पुढील नंबरवर संपर्क कराता येईल. संपर्क : खुशबू अग्रवाल-7498231875, शोभा मुरारका-9326278129 

२२ जानेवारी सोमवार या दिवशी प्राणप्रतिष्ठा यज्ञ हा सकाळी १० वाजत होईल. तसेच महाआरती दुपारी १२.३८  वाजता होईल. सर्व सनातनी धर्म प्रेमी यांनी उपस्थित राहून आम्हास अनुग्रहित 
करावे. तसेच DJ आणि Live Screen ची व्यवस्था केली गेली आहे.
 
शुभ स्थळ : श्री कालिंका माता मंदिर, कृष्ण प्लाझाच्या समोर, लकडगंज बगीच्याजवळ, नागपुर. 

दुपारी १ ते ३ मध्ये आदर्श जीवदया केंद्रव्दारा भजन प्रस्तुति होणार आहे. 
२१११ दिपोत्सव वेळ संध्याकाळी ६ वाजेपासून, राम भजन संध्याकाळी ७ वाजेपासून, प्रसाद भोजन रात्री ८ वाजेपासून.