शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 6 फेब्रुवारी 2024 (12:21 IST)

आंबेडकरी चळवळीचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायिका किरण पाटणकर यांचे निधन

आंबेडकरी चळवळीत जनमानसात धम्मक्रांतीचा प्रचार प्रसार करून लोकप्रिय गायक नागोराव पाटणकर यांचा वारसा पुढे नेणाऱ्या 'भीमराज की बेटी' अशी ओळख निर्माण करणाऱ्या प्रसिद्ध गायिका किरण पाटणकर यांचे दीर्घ आजाराने वयाच्या 62 व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगा व मोठा परिवार आहे. 
 
गायिका किरण पाटणकर यांचा जन्म अमरावती जिल्ह्यात बडनेरा येथे झाला. त्यांचे वडील नागोराव पाटणकर यांची लोकप्रियता त्या काळात प्रसिद्ध होते. त्यांच्या पावलावर पाऊल टाकत त्यांनी गायनाच्या क्षेत्रात पदार्पण केले. त्यांची ओळख लोकगायक व कव्वाल म्हणून ओळख निर्माण झाली. आंबेडकरी जलशांमधून किरण पाटणकरांचा आवाज पसरला.त्यांनी शेकडोच्या संख्यने भीमगीते गायली. त्यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीचा मधुर आवाज हरपला. 

 Edited by - Priya Dixit