शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : बुधवार, 5 ऑक्टोबर 2022 (13:14 IST)

गोळीबारात प्रसिद्ध बिल्डरचा मृत्यू

प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्यावर त्यांच्या नांदेड येथील निवासस्थानी अज्ञात हल्लेखोरांनी
गोळ्या झाडल्या. बियाणी हे एक प्रसिद्ध व्यापारी, घनिष्ठ राजकीय संबंध असलेले बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांना  गंभीर दुखापत झाली असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात पण  उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणाचा तपास करत असलेले पोलीस हल्लेखोरांची माहिती घेत आहेत. 
  
 काय आहे प्रकरण?
नांदेडमध्ये प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्यावर घरासमोर अज्ञात आरोपींनी गोळीबार केला होता. या गोळीबारात बियाणी आणि त्यांचा चालक गंभीर जखमी झाले होते. दोघा जणांवर नांदेडच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र संजय बियाणी यांनी उपचारांदरम्यान अखेरचा श्वास घेतला.
 
संजय बियाणी हे नांदेडमधले मोठे प्रस्थ असून खंडणीच्या वसुलीसाठी किंवा व्यावसायिक स्पर्धेतून हा गोळीबार झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत हा गोळीबार कुणी केला याचा शोध सुरु केला आहे. या घटनेमुळे नांदेड शहरात तणावाचे वातावरण पसरलं आहे.