शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 5 एप्रिल 2022 (10:38 IST)

महाविकास आघाडी सरकारने जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला – फडणवीस

devendra fadnavis
राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे गडचिरोलीत  होते. यावेळी त्यांनी एका कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित केलं. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. राज्यातील सरकारवर टीका करताना फडणवीसांनी मद्यविक्रीच्या, वीज कापणीच्या मुद्दयावर बोलताना हे सरकार असंवेदनशील असून, २०२२ ला राज्यात भाजपचं सरकार येईल असं म्हटलं. एवढ्यावर न थांबता, पुढे त्यांनी शिवसेनेने आमच्या पाठीत खंजीर खूपसला असं म्हटलं आहे.
 
देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी वेगवेगळ्या मुद्दयांवरून राज्य सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. ओबीसी आरक्षणावर बोलताना ते म्हणाले राज्य सरकारमुळे ओबीसी आरक्षणसमोर आव्हानं निर्माण झाली, मात्र आम्ही ते आरक्षण जाऊ देणार नाही. शेतकऱ्यांच्या मुद्यावर बोलताना त्यांनी वीज कापणीचा विषय उपस्थित करत सरकारला संवेदना नसल्याचा आरोप केला. तसंच बार मालकांना मविआ ससरकारने मदत केली, सरकारला बार मालकांची चतिंतका आहे मात्र शेतकऱ्यांची नाही असंही पुढे फडणवीस म्हणाले.
 
भाजप सरकारच्या काळात धान खरेदीत घोटाळा नव्हता. मात्र या सरकारच्या काळात घोटाळे झाले, सर्वसामान्य लोकांची चिंता या सरकारला नसून, ठाकरे सरकार नालायक असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे आता २०२२ मध्ये राज्यात भाजप सरकार येईल असा विश्वास देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला.