शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 2 फेब्रुवारी 2021 (21:37 IST)

नांगरे पाटील यांनी घेतला मुंबईतील इस्राईल दुतावासाचा सुरक्षा आढावा

राजधानी दिल्लीत इस्राईलच्या दुतावासावर झालेल्या हल्ल्यानंतर मुंबईतही हाय अलर्ट जारी करण्यात आलाय. त्यामुळेच मुंबईचे पोलीस आयुक्त (कायदा सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील स्वतः मैदानात उतरलेत.  मुंबईतील इस्राईलच्या दुतावासाला भेट देत येथील सुरक्षेचा आढावा घेतला. मुंबईत लोवर परेल, करी रोड भागातील मॅरेथॉन फ्युचरेक्स या बहुमजली इमारतीत हे दुतावास आहे. याच पार्श्वभूमीवर विश्वास नांगरे पाटील यांनी या इमारतीसह परिसराची स्वतः पाहणी केली.
 
डिसीपी (जोन 3) परमजीत दहिया देखील मुंबईतील इस्राईल दुतावासाच्या ठिकाणी पोहचलेत. या ठिकाणची पाहणी करुन सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आलीय. दिल्लीजवळ इस्राईल एम्बसीवर हल्ल्याची घटना घडलीय. त्यानंतर मुंबईतील इस्राईल हाऊस आणि चाबाड हाउसच्या सुरक्षेत वाढ करण्यात आलीय.
 
दरम्यान, दिल्लीत इस्राईलच्या दुतावासाजवळ एक आयईडी स्फोट झाला होता.