1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 12 जून 2023 (21:00 IST)

नाशिक : बैलगाडा शर्यत बेतली जीवावर; जखमी झालेल्याचा मृत्यू

नाशिक मखमलाबाद येथे बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी गेलेल्या नागरिकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. श्रावण जगन्नाथ सोनवणे असे या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी नाशिकच्या म्हसरुळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
 
शहरातील म्हसरुळ परिसरात भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. ही शर्यत बघण्यासाठी प्रेक्षकांनी मोठया प्रमाणात गर्दी केली होती. यात मखमलाबाद येथील श्रावण सोनवणे हे देखील उपस्थित होते. मात्र एका शर्यतीदरम्यान गोंधळ उडाल्याने ते जखमी झाले त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला.
 
या शर्यतीत सोनवणेबरोबरच आठहून अधिक प्रेक्षक जखमी झाले होते. त्यातील पाच जणांवर मविप्रच्या आडगाव येथील रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यातील दोघांना उपचारानंतर सोडून देण्यात आले आहेत. उर्वरित तिघांची प्रकृती स्थिर आहे. अन्य तीन जखमींना मनपाच्या रुग्णालयात उपचार करुन सोडून देण्यात आले आहे.

Edited By- Ratnadeep Ranshoor