गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 12 जून 2023 (16:39 IST)

Bullock Cart Race : बैलगाडा शर्यती दरम्यान बैल उधळून बैलगाड्या पाण्यात

बैलगाडा शर्यत हा थरारक तसेच जीवघेणा खेळ आहे. सध्या बैलगाडा शर्यत राज्यात सुरु आहे.टाळ्या, शिट्या आणि आनंदाचा मध्ये बाळ अबाल वृद्धांचा उत्साह बघण्यासारखा असतो. बैलगाडा शर्यत ही गावकऱ्यांसाठी मोठी पर्वणी आहे. या सोहळ्यात सर्व जण उत्साहाने भाग घेतात. काही वेळा या दरम्यान अपघात घडत असतात. सध्या सोशल मीडियावर बैलगाडा शर्यतीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. का व्हिडीओ कुठला आहे अद्याप हे कळू शकले नाही.हा व्हिडीओ अंगाचा थरकाप उडवणारा आहे. 

या व्हिडीओ मध्ये धावपट्टीवर बैलगाड्या समान रेषेत उभ्या आहेत.प्रेक्षकांच्या टाळ्या शिट्या सुरु झाल्या. माईकवर घोषणा झाली आणि झेंडा फडकावला.बैलगाड्या सुटल्या आणि सर्व बैलगाड्या सरळ रेषेत जाणार असे वाटले पण दोन बैलगाड्यानी धावपट्टी सोडली आणि बैल उधळले आणि बैलगाड्या धावपट्टी सोडून धावू लागल्या. बैलगाडा चालकाने बैल थांबविण्यासाठी पुरेपूर जोर लावला पण त्यात ते अपयशी ठरले. माइकवरून घोषणा सुरु होती. बैलगाड्या पाण्यात जातील. आणि दोन्ही बैलगाड्या पाण्यात शिरल्या. पाण्यात बैलांना पकडण्यासाठी बैलगाडा चालकाने चक्क पाण्यात उडी घेतली आणि पोहत बैलांपर्यंत गेले. तोवर बैलांच्या नाका तोंडात पाणी गेल्या मुळे बैल शांत झाले होते. बैलांवर नियंत्रण मिळवून बैलांना काठावर आणले. सुदैवाने मोठा अपघात टळला. बैलगाडा चालकांना पोहता येत नसते तर मोठा अपघात घडला असता. 


Edited by - Priya Dixit