शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

मोठा निर्णय ! बैलगाडा शर्यतीवर बंदी नाही

SC Decision On Bailgada Sharyat बैलगाडा शर्यतीवर बंदी नाही असा निकाल सुप्रीम कोर्टाने दिली आहे. कोर्टाने अंतिम निर्णय दिल्याने आता बैलगाडा शर्यतीचा मार्ग मोकळा झाला आहे. यावेळी तामिळनाडूतील जलीकट्टू आणि महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीच्या निकालाचे एकत्रित वाचन करण्यात आले.
 
सर्वोच्च न्यायालयाने डिसेंबर 2021 मध्ये महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीवरची बंदी हटवली तेव्हा महाराष्ट्राला मोठा दिलासा मिळाला होता मात्र संबंधित कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिका दाखल करण्यात आली होती.
 
सुप्रीम कोर्टाने तामिळनाडू सरकारच्या कायद्याची वैधता कायम ठेवली ज्यात राज्यातील पारंपारिक जल्लीकट्टूला परवानगी आहे, असे खंडपीठाने नोंदवले. न्यायमूर्ती के एम जोसेफ यांच्या अध्यक्षतेखालील 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाने सांगितले की आम्ही विधीमंडळाच्या निर्णयात व्यत्यय आणणार नाही.
 
निकाल देताना सांगितले गेले की कोणत्याही दंडात्मक कायद्याचे उल्लंघन होत असल्यास अशा परंपरांना परवानगी देता येणार नाही.
 
2011 साली मुंबई उच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवर बंदी आणली होती. तर 20 एप्रिल 2012 रोजी राज्य सरकारने परिपत्रक काढून राज्यात बैलगाडी शर्यतीवर बंदी घातली. आणि 16 डिसेंबर 2021 मध्ये अटी आणि शर्तीसह बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवली गेली होती.