रविवार, 8 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : रविवार, 10 डिसेंबर 2023 (17:11 IST)

Nashik Bus Fire : नाशिकमध्ये प्रवाशांनी भरलेल्या बसला आग, प्रवाशी बचावले

नाशिकात धावत्या शिवशाही बस ने अचानक पेट घेतला या बस मध्ये एकूण 25 प्रवाशी होते. सुदैवाने प्रवाशी या अपघातातून बचावले आहे. 

सदर घटना नाशिक- छत्रपती संभाजी नगर महामार्गावर निफाडच्या चितेगाव फाटा येथे घडली आहे. धावत्या शिवशाही बसने अचानक पेट घेतला. या वेळी बस मध्ये 25 प्रवाशी होते. बसच्या चालक आणि वाहक ने प्रसंगावधान राखून प्रवाशांना खाली उतरवले. प्रवाशी खाली उतरल्यावर बस पूर्णपणे जळून खाक झाली.  
 
या अपघातात सुदैवाने प्रवाशी पूर्णपणे सुरक्षित आहे. सुदैवाने मोठा अनर्थ टळला.या घटनेची माहिती मिळतातच अग्निशमन दलाचे बंब आले आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरु आहे. शॉट सर्किटमुळे बस ने पेट घेतलेला असण्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.या घटनेमुळे सर्वानाच धक्का बसला आहे. 

25 प्रवाशांनां घेऊन निघालेल्या शिवशाही बस ने अचानक पेट घेतल्यामुळे प्रवाशी घाबरले. मात्र बसचे चालक आणि वाहक यांनी न घाबरता प्रसंगावधान राखून बस रस्त्याच्या बाजूला करून थांबवली आणि प्रवाशांना खाली उतरवले. त्यामुळे मोठा अपघात टाळला गेला. बसच्या चालक आणि वाहकचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. 

Edited by - Priya Dixit