शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 22 डिसेंबर 2022 (08:34 IST)

नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख भाऊ चौधरी यांची शिवसेना तसेच संपर्क प्रमुख पदावरून हकालपट्टी

sanjay raut
नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख भाऊ चौधरी यांची शिवसेना तसेच संपर्क प्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. यासंदर्भात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. विशेष म्हणजे, भाऊ चौधरी हे संजय राऊत यांचे निकटवर्तीय असल्याचे म्हटले जात होते.
 
संजय राऊत यांनी ट्विट करायच्या आधी त्यांचे निकटवर्तीय नागपूरमध्ये शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे वृत्त समोर आले. त्यामुळे संजय राऊत यांच्या जवळचे काही मोजकेच नेते आहेत. यामध्ये बाळा सावंत, भाऊ चौधरी आणि बंधु सुनिल राऊत यांच्या नावाची चर्चा झाली. तसेच, नाशिकचा कोणी नेता आहे का? यावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगली. पण, संजय राऊत यांनी ट्विट केल्याने भाऊ चौधरी हेच शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.
 
संजय राऊत यांनी भाऊ चौधरी यांच्या हकालपट्टी संदर्भात ट्विट केले आहे. "शिवसेना नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख भाऊ चौधरी यांची शिवसेना तसेच संपर्क प्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात येत आहे.शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात येत आहे.", असे संजय राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. 
Edited by: Ratnadeep Ranshoor