मंगळवार, 4 फेब्रुवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 16 जुलै 2022 (08:04 IST)

नाशिकचे जवान रंगनाथ पवार यांना कर्तव्य बजातांना वीरमरण

नाशिकच्या निफाड तालुक्यातील महाजनपूर येथील सुपुत्र वीर जवान रंगनाथ पवार यांना राजस्थान येथे भारतीय सैन्यदलात कर्तव्य बजावत असतांना वीर मरण आले आहे. निफाड तालुक्यातील रंगनाथ पवार हे महाजनपूर राजस्थानमधील बाडमेर येथे कर्तव्यावर होते. कर्तव्य बजावत असतानाच त्यांना वीरमरण आले असून त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. 
 
महाजनपूर येथील रंगनाथ वामन पवार यांचे १२वी पर्यंत निफाड तालुक्यातच शिक्षण झालं. घरची परिस्थिती गरिबीची असल्याने ते गुरे चारण्यासाठी जात असायचे. त्यातच १९९८ साली त्यांच्या मित्रांनी त्यांना मध्यप्रदेशातील भोपाळ येथे सैन्य दलात भरती होण्यासाठी नेले. तेथेच त्यांची निवड झाली. पुढे प्रशिक्षणासाठी त्यांना सहा महिन्यासाठी झारखंडमधील हजारीबाग येथे पाठविण्यात आले. त्यानंतर बीएसएफमध्ये (सीमा सुरक्षा बल) त्यांची नियुक्ती करण्यात झाली. अशी त्यांचा देशसेवेचा प्रवास सुरू झाला होता. सध्या ते राजस्थान मधील बाडमेर येथे सेवेत होते.  महाजनपूर सारख्या छोट्याश्या खेड्यातून पुढे येत जवान रंगनाथ पवार यांनी अतिशय हलाकीच्या परिस्थितीशी झुंज दिली होती.