नाशिक मध्ये नाल्यात पडून 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू
सध्या राज्यात सर्वत्र पाऊस सुरु आहे. राज्यात काही जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट तर काही भागात रेड अलर्ट जारी केले आहे. नाशिक मध्ये मुसळधार पाऊस सुरु असता नदी नाले ओसंडून वाहत आहे. काही भागात पूरसदृश्य स्थिती झाली आहे. नाशिकात नाले मोठ्या प्रमाणात वाहत आहे. नाशिकात नाल्याच्या पाण्यात पडून एका 12 वर्षाच्या मुलाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नाशिक औरंगाबाद रोड शिलापूर येथे घडली आहे. कृष्ण दीपक गांगुर्डे(12) असं या मयत मुलाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कृष्णचे आईवडील शेतात चारा आणण्यासाठी गेले असता त्यांच्या पाठीमागे कृष्ण जात असताना त्याच्या तोल जाऊन तो नाल्यात पडला आणि त्याच्या जागीच दुर्देवी मृत्यू झाला. या घटनेची आडगाव पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.