सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 12 जुलै 2022 (17:21 IST)

राज्यात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दुर्घटना

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे पूरस्थिती ओढवल्याचं चित्र आहे. हवामान विभागाकडून सात जिल्ह्यात रेड अलर्ट तर 6 जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
 
गडचिरोली, रायगड, रत्नागिरी, पालघर, नाशिक, पुणे आणि कोल्हापूर या जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, सातारा, औरंगाबाद, चंद्रपूर अशा काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळेल असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.वर्धा जिल्ह्यात वीज पडून दोघांचा मृत्यू झाला, तर पुरात वाहून गेल्यानं दोन जणांचा मृत्यू झाला. गडचिरोली जिल्ह्यात अहेरी तालुक्यातल्या पेरमिली गावाजवळच्या नाल्याला आलेल्या पुरात ट्रक वाहून गेल्यानं तीन जणांचा मृत्यू झाला आहे.नांदेड जिल्ह्यातल्या भोकर तालुक्यात अंगावर वीज पडून एकाचा मृत्यू झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकाचा मृत्यू झाला
अमरावती विभागात वीज पडून गेल्या 30 दिवसांत 22 जणांचा मृत्यू झाला आहे. तसंच मुसळधार पावसामुळे हजारो घरांची पडझड झाली असून पीकांचंही मोठं नुकसान झालं आहे.
 
नाशिकध्ये सप्तश्रृंगी गड येथे अतिवृष्टीमुळे पावसाच्या पाण्याचा प्रवाह वाढला आणि यात 7 भाविक जखमी झाल्याची माहिती मिळते आहे.गडचिरोली जिल्ह्यात अहेरी तालुक्यातल्या पेरमिली गावाजवळच्या नाल्याला आलेल्या पुरात ट्रक वाहून गेल्यानं तीन जणांचा मृत्यू झाला आहे
 
पालघरमध्ये जव्हार, मोखाडा या दुर्गम भागांमध्येही जोरदार पाऊस सुरू आहे. जव्हार तालुक्यात वांगणी नदीला पूर आल्याने काही गावांचा संपर्क तुटला आहे.
 
विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झालीय. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी गडचिरोलीत जाऊन या भागाची हवाई पाहणी केली.
नाशिकमध्ये पुढील 4 दिवस रेड अलर्ट जारी करण्यात आला असून, नाशिकमधील एकूण सहा धरणांमधून 50 हजार क्युसेक्सनं जायकवाडीकडे विसर्ग सुरू आहे.
 
नाशिक शहरात संपूर्ण रामकुंड परिसर पाण्याखाली आहे, तर संपूर्ण जिल्ह्यात यंत्रणा सतर्क झाल्या असून 7 छोटे पूल पाण्याखाली तर 12 गावांचा संपर्क तुटला आहे
नांदेड, हिंगोली जिल्ह्यात सातत्याने बरसत असलेल्या पावसाने पैनगंगा नदी काठोकाठ भरून वाहतेय.
नंदुरबार जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पावसाने हजेरी लावत जोरदार सुरवात केली आहे.
नंदुरबारच्या अक्कलकुवा तालुक्यातील वडफळी येथे जोरदार पावसामुळे देव नदी ओसंडून वाहत आहे.