सप्तशृंगी गडावरील भगवतीचे मंदिर बंद राहणार तब्बल 45 दिवस फोटो
साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या सप्तशृंगी देवी मंदिर हे भाविकांसाठी तब्बल 45 दिवस बंद राहणार आहे. कोरोना काळात हे मंदिर दर्शनासाठी बंद होते. त्यानंतर आता सलग इतक्या मोठ्या प्रमाणात प्रथमच बंद असणार आहे. संदर्भात मंदिर प्रशासनाने माहिती दिली आहे. सध्या सुरू असलेल्या अतिवृष्टीचा आणि मंदिर बंद राहण्याचा काहीही संबंध नाही तर भगवतीच्या मूर्तीचे काम करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
येत्या गुरुवार (21 जुलै) पासून मंदिर भाविकांसाठी बंद होणार आहे. ते पुढील 45 दिवस बंद असेल. श्री भगवती स्वरूप मूर्ती संवर्धन व देखभाल अनुषंगिक पूर्ततेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र विश्वस्त संस्थेची पहिली पायरी येथे असलेल्या उपकार्यालयनजीक श्री भगवतीचे हुबेहूब प्रतिकृती भाविकांच्या पर्याय दर्शनाची व्यवस्था म्हणून कार्यरत केली जाणार आहे. तसेच भाविकांना दिल्या जाणाऱ्या महाप्रसाद भक्तनिवास व इतर सुविधा या सातत्यपूर्वक कार्यरत असल्याची माहिती संस्थेच्या प्रशासनामार्फत देण्यात आली आहे.
2012-13 पासून श्री भगवती स्वरूप मूर्ती संवर्धन व देखभाल कामकाजाच्या अनुषंगाने नियोजन सुरू असून सद्यस्थितीत कार्यरत मा. अध्यक्ष व विश्वस्त मंडळ यांनी शासनाच्या पुरातत्त्व विभाग आयआयटी पवई बॉम्बे यांच्यासह मे अजिंक्यतारा कन्सल्टन्सी नाशिक यांच्यामार्फत संदर्भीय पूर्तते कामे तज्ञ मार्गदर्शन प्राप्त करून श्री भगवती स्वरूप मूर्ती संवर्धन व देखभाल संबंधित पूर्तता होणे अंतिम दृष्टीने निर्णय घेतल्याचे संस्थेच्या प्रशासनातर्फे सांगण्यात आले.