मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 13 मार्च 2024 (09:32 IST)

नाशिक: राहुल गांधी यांचा रोड-शो; शहरातील वाहतूक मार्गात महत्वाचे बदल

काँग्रेस पक्षाचे खासदार राहुल गांधी यांची भारत यात्रा गुरुवारी (ता. १४) दुपारी नाशिक शहरात पोहोचणार आहे. खासदार गांधी यांच्या रोड शोला द्वारकेपासून प्रारंभ होऊन सारडा सर्कल, दूधबाजाराकडून शालिमार, त्र्यंबक नाक्यापर्यत होणार आहे. यामुळे या मार्गांवरील वाहतूक पर्यायी मार्गांवरून वळविण्यात आली असून, वाहनचालकांनी पर्यायी मार्गांवर वापर करण्याचे आवाहन शहर वाहतूक शाखेतर्फे करण्यात आले आहे.
 
काँग्रेस पक्षाचे खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सुरू आहे. बुधवारी (ता. १३) ही यात्रा नाशिक जिल्ह्यात दाखल होणार आहे. मालेगाव, चांदवड, ओझर मार्गे ही यात्रा गुरुवारी (ता. १४) दुपारी एक ते दोन वाजेच्या सुमारास द्वारका चौक येथे पोहोचणार आहे.
 
त्यानंतर राहुल गांधी यांचा रोड शो सुरू होईल. द्वारका सर्कल, सारडा सर्कल, फाळके रोड, दूध बाजार, त्र्यंबक पोलीस चौकी, खडकाळी सिग्नल, शालीमार चौक, इंदिरा गांधी पुतळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, सीबीएस सिग्नल, मोडक सिग्नल (त्र्यंबक नाका) या ठिकाणी रोड शो संपणार आहे. त्यानंतर राहुल गांधी हे त्र्यंबकरोडने त्र्यंबकेश्वर व पुढे पालघरकडे रवाना होणार आहेत.
 
दरम्यान, रोड शोच्या मार्गावर दुपारी १ वाजेपासून ते रोड शो संपेपर्यंत वाहतूकीसाठी बंद करण्यात येणार आहे. तर, या मार्गांवरील वाहतूक पर्यायी मार्गांने वळविण्यात आली आहे. शहर वाहतूक शाखेचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे.
 
प्रवेश बंद मार्ग: द्वारका सर्कल ते सारडा सर्कल, फाळके रोड ते दूध बाजार, त्र्यंबक पोलीस चौकी ते खडकाळी सिग्नल, शालिमार चौक ते सीबीएस सिग्नल, सीबीएस सिग्नल ते मोडक सिग्नल (त्र्यंबक नाका)
 
पर्यायी मार्ग:
ट्रॅक्टर हाऊस ते द्वारका सर्कलकडे येणारी वाहतूक ट्रॅक्टर हाऊस – तिगरानीया रोड – मारुती वेफर्समार्गे इतरत्र, काठे गल्ली सिग्नल ते द्वारका सर्कलकडे येणारी वाहतूक काठे गल्ली सिग्नल – नागझी सिग्नल – भाभानगर – मुंबई नाकामार्गे मार्गस्थ, बादशाही कॉर्नर ते दूध बाजार जाणारी वाहतूक तिवंधा चौक मार्गे मार्गस्थ, मोडक सिग्नलकडून खडकाळी सिग्नल ते दूधबाजारकडे जाणारी वाहतूक त्र्यंबक नाका ते गडकरी सिग्नलमार्गे मार्गस्थ, खडकाळी सिग्नल ते शालिमार जाणारी वाहतूक खडकाळी सिग्नल – अण्णाभाऊ साठे पुतळा – त्र्यंबक नाका मार्गे मार्गस्थ, सांगली बँक सिग्नलकडून शालिमारकडे जाणारी वाहतूक सांगली बॅक – धुमाळ पॉईंटमार्गे मार्गस्थ, – गडकरी सिग्नल ते सारडा सर्कलकडे जाणारी वाहतूक गडकरी सिग्नल – मुंबई नाका मार्गस्थ
 
Edited By - Ratnadeep Ranshoor