बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated :नाशिक , मंगळवार, 18 ऑक्टोबर 2022 (19:34 IST)

Nashik Rain : वीज पडून शेतकऱ्यासह बैलांचा मृत्यू

lightning
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, खानदेश, विदर्भ याभागात पावसाचा जोर वाढला असून नाशिक येथे देखील कालपासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.  मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावल्याने खरिपाची पेरणी शेतकरी सुखावला असला तरी केळी व अन्य पिकांना दणका बसल्याने काही शेतकऱ्यांना याचा जोरदार फटका बसला आहे. दरम्यान कालपासून नाशिक जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत आहे. विजाच्या कडकडाटाने पाऊस पडत असल्याने एका शेतकऱ्याचा वीज पडल्याने मृत्यू झाला आहे. दरम्यान आतापर्यंत नाशिकमध्ये तीन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे.
  
नाशिक शहर व परिसरात सलग दोन दिवस वादळी वारे आणि मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडत आहे. काल (दि.10) सायंकाळनंतर आलेल्या या पावसाने नाशिककरांची धांदल उडवली. नाशिकच्या ग्रामीण भागात कळवणमध्ये मौजे विसापूर येथे वीज पडून 36 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. तसेच सटाण्यातील केरसानेत वीज पडून बैलजोडी ठार झाली.