शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 13 ऑगस्ट 2022 (14:57 IST)

नाशिकच्या आर.डी. ग्रुप तर्फे लेह-लडाख मध्ये राष्ट्रध्वजाचे वितरण

leh Ladakh
लडाख भारताची शान - राहुल देशमुख
लडाख -  लेह लडाख परिसर हा भारताची शान असून इथल्या प्रत्येक घरावर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त तिरंगा फडकावला जावा असे प्रतिपादन नाशिक येथील सुप्रसिद्ध आर.डी. ग्रुपचे अध्यक्ष श्री. राहुल देशमुख यांनी केले.
लडाख येथिल इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्सतर्फे  तेथील विद्यार्थ्यांना राष्ट्रध्वज वितरीत करण्यासाठी आर डी ग्रुपला  विनंती करण्यात आली होती. या आवाहनाला प्रतिसाद देत एक हजार मोठ्या  आकाराच्या खादीच्या तिरंग्यांचे वितरण श्री. राहुल देशमुख व सौ अंजली देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. लेंमडण  मॉडेल स्कूल येथे झालेल्या कार्यक्रमात, या प्रसंगी इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्सचे 5व्या बटालियंचे  कमांडंट डी. जस्टीन रॉबर्ट कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.  
leh Ladakh

या प्रसंगी राहुल देशमुख यांनी सांगितले की लेह लडाख हा भारताचा अविभाज्य भाग असून त्यावर सातत्यानं सीमेपलीकडून आगळीक केली जात असते. येथील नागरिकांचा राष्ट्र अभिमान वृद्धिंगत करण्यासाठीच आरडी ग्रुप तर्फे राष्ट्रध्वज वितरीत करण्यात आले असल्याचे सांगीतले. कमांडंट डी. जस्टीन रॉबर्ट यांनी आरडी ग्रुपचे आभार मानले. लेह लडाख परिसरातील एक हजार विद्यार्थ्यांना वितरण करण्यात आले.