सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 13 ऑगस्ट 2022 (14:38 IST)

दादरमध्ये प्रति शिवसेना भवन नाही तर

uday samant
दादरमध्ये शिंदे गटाकडून प्रति सेनाभवन उभारण्यात येणारं आहे. शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी शुक्रवारी एका वृत्तवाहिनीशी बोलताना ही माहिती दिली होती. यांनतर शिंदे गटावर टीका होत होती. आत याबाबत याबाबत मंत्री उदय सामंत यांनी ट्वीट केले आहे. प्रति शिवसेना भवन नाही तर, जनसंपर्कासाठी कार्यालय बांधत असल्याचे स्पष्टीकरण सामंतांनी दिले आहे.
 
“प्रति सेनाभवन नव्हे तर जनसंपर्कासाठी कार्यालय बांधतोय, शिवसेना भवनाबद्दल (Shivsena Bhavan) आदर कायम आहे”, असं उदय सामंत म्हणाले आहेत. “मुंबई दादर येथे प्रति शिवसेना भवन मा. एकनाथजी शिंदे करत आहेत, हा गैरसमज पसरवला जात आहे. मा. मुख्यमंत्री महोदयांना सर्वसामान्य जनतेला भेटता याव ह्यासाठी मध्यवर्ती कार्यालय असावे आमचा प्रयत्न आहे. शिवसेना भवनबद्दल आम्हाला कालही आदर होता उद्याही राहील”, असं ट्विट उदय सामंत यांनी केलं आहे.