संबंधित माहिती
- गिरीश महाजन यांचे खडसे यांच्या टीकेला प्रत्यु्त्तर
- जालन्यात 390 कोटींची बेनामी मालमत्ता जप्त: आयकर विभागाची टीम वराती म्हणून दाखल झाली, कोड वर्ड होता- दुल्हनिया हम ले जायेंगे; 58 कोटींची रोकड सापडली
- मंत्रिपद न मिळाल्याने पंकजा मुंडे संतापल्या! एकनाथ खडसेंचा सल्ला - थांबू नका, नेतृत्वाला भेटा
- सोन्याच्या मण्याचा पाऊस
- दोन दिवसात राज्यातल्या नव्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप : सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात निवडणुका जाहीर होतील
शिवसेनेत बंड झालाय का? उदयनराजे यांचा खोचक सवाल
भाजपा खासदार उदयराजे भोसले यांनी शिवसेनेतील बंडखोरी बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गटाला टोला लगावला आहे. शिवसेनेत बंड झालाय का? असा खोचक सवाल उदयनराजेंनी केला. तसेच “शिवसेना शिवाजी महाजारांच्या नावाने स्थापन केली, मग मी म्हणायचं का शिवसेना माझी आहे” असा प्रश्न उदयनराजेंनी केला. ते पुण्यात माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलत होते.
उदयनराजे म्हणाले, “शिवसेनेत बंड झाला याबाबत मला काही माहिती नाही. बंड झालाय का? शिवसेना आहेच. शिवसेना कुणाची आहे यावरून वाद सुरू आहे.शिवसेना शिवाजी महाजारांच्या नावाने स्थापन केली, मग मी म्हणायचं का शिवसेना माझी आहे. अरे वा, मग शिवसेना माझीच म्हटली पाहिजे. महाराष्ट्र माझाच म्हटला पाहिजे. काही नाही म्हणायचं.”
