शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 13 ऑगस्ट 2022 (09:36 IST)

शिवसेनेला थेट आव्हान ! प्रति सेना भवन उभारणार ?

shivsena
मुंबई : शिवसेनेच्या चाळीस आमदारांनी वेगळी भूमिका घेत महाविकास आघाडीतून बाहेर पडत राज्यात सरकार स्थापन केल्यानंतर आता शिवसेनेत दोन गट तयार झाले आहेत. त्यामुळे मूळ शिवसेना आपल्या कार्यालयातून काम करत असताना आता मुख्यमंत्री एकनाथ  शिंदे यांच्या गटाकडून दादरमध्ये प्रति सेनाभवन उभारण्यात येणार आहे .या बाबत  शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी माहिती दिली आहे. तसेच प्रभागामध्ये एक कार्यालय देखील उभारण्यात येणार आहे. सरवणकर यांनी हे प्रतिसेना भवन नसून ते मुंबईतील लोकांच्या समस्या सोडवण्यासाठीचे कार्यालय असणारा असल्याचे म्हटले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वत: या कार्यालयातून जनतेच्या समस्या जाणून घेणार आहेत. येत्या 15 दिवसांमध्ये या कार्यालयाचं उद्घटान केल जाणार आहे. मुंबई शहरातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी  हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आमदार सदा सरवणकर यांनी दिली आहे . या कार्यालयांसाठी जागा निश्चित करण्यात आल्या असून त्या- त्या प्रभागातील शाखाप्रमुख नागरिकांच्या समस्या सोडवतील. शिवसेनेचे नेते देखील या कार्यालयांतून नागरिकांच्या समस्या जाणून घेणार आहेत .आणि त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करतील, अशी माहिती आमदार सदा सरवणकर यांनी दिली आहे .