सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 13 ऑगस्ट 2022 (14:45 IST)

पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांची ब्लॉकमधून सुटका

railway track
अभियांत्रिकी कामांसाठी रविवार, १४ ऑगस्टला मध्य रेल्वेच्या सीएसएमटी- विद्याविहार या स्थानकादरम्यान आणि कुर्ला- वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मात्र रविवारी पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक नाही. मुंबई सेंट्रल आणि माहीम दरम्यान दोन्ही जलद मार्गावर शनिवारी मध्यरात्री चार तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
 
मध्य रेल्वेवर सीएसएमटी – विद्याविहार दरम्यान अप आणि धीम्या मार्गावर सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ पर्यंत मेगाब्लॉक असेल. त्यामुळे सीएसएमटी येथून सकाळी १०.४८ ते दुपारी ३.४९ या वेळेत सुटणाऱ्या धीम्या लोकल सीएसएमटी-विद्याविहार स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील. भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकावर थांबतील. पुढे पुन्हा डाउन धिम्या मार्गावर वळवल्या जातील.