शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 12 एप्रिल 2022 (08:34 IST)

इंदूर येथील खूनाच्या आरोपीला नाशिक उपनगर पोलिसांनी सापळा रचून केले गजाआड

jail
नाशिकच्या जेलरोड येथील नारायण बापू नगर येथे मध्य प्रदेशातील इंदूर येथून खून करून फरार झालेल्या आरोपीस उपनगर पोलिसांनी शिताफीने सापळा रचून गजाआड केले. सिद्धार्थ सुनील सिंग राठोड (२९ रा. इंदूर, मध्यप्रदेश) हे आरोपीचे नाव आहे. एरोड्रोम पोलीस स्टेशनच्या हद्दीत खुनाचा गुन्हा करून तो पळून गेला होता. या आरोपीला अटक केल्यानंतर मध्य प्रदेश पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील इंदूर येथे खून करून फरार असलेला संशयित आरोपी जेलरोड येथील नारायण बापूनगरमध्ये येणार रस्त्याची गुप्त माहिती पोलिसांनी मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. रस्त्याच्या कडेला पोलिसांना हा आरोपी दिसताच त्यांनी त्याला थांबवून चौकशी सुरू केली. मात्र तो माहिती देत नव्हता. त्यानंतर पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळून जाण्याचा प्रयत्न करत असतानाच त्याला शिताफीने अटक केली. आरोपीला अटक केल्यानंतर उपनगर पोलिसांनी इंदूर पोलिसांशी संपर्क साधून फरार असलेल्या आरोपीबाबत माहिती दिली. त्यानंतर इंदूर पोलिसांचे एक पथक आले व संशयित खुनातील आरोपीला उपनगर पोलिसांच्या ताब्यातून घेऊन गेले.